उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथे अभूतपूर्व सोहळा
बाळासाहेब पवार प्रतिनिधी
उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मोठ्या थाटामाटात तुतारीच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात व फुलांच्या वर्षावात सौ कौशल्याबाई भाऊराव कदम या दांपत्याच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार बनण्याकरिता संपूर्ण गाव अनावरण सोहळ्यासाठी उलटले होते. दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मार्लेगाव वाशीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पहाटे पाच वाजता दीपोत्सव साजरा केला यावेळी संपूर्ण पुतळा परिसर उजळला होता पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी परिसर रांगोळ्याने सजवण्यात आला होता सदर अनावरण पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी स्वेच्छेने दहा लाख रुपये देणाऱ्या भाऊराव कदम व कौशल्याबाई कदम या दांपत्याच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी ढोल ताशाच्या गजराने तसेच रंगाची व फुलांची उधळण आणि छत्रपती शिवरायांच्या घोषणाने आसमंत दणाणून गेला होता यावेळी माजी आमदार राजेंद्र नजरधने, प्राचार्य मोहनराव मोरे, चितांगराव कदम, कृष्णा पाटील अष्टीकर, राजेश खामनेकर, अँड बळीराम मुटकुळे, सतीश नाईक, नितीन शिंदे यांच्या आवाजाने शिवगर्जना करण्यात आली व मराठा योद्धा आंदोलन कर्ते सचिन गाडगे यांचा शिवप्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील अनेक राजकीय मंडळी, सामाजिक मंडळी उपस्थित होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावकऱ्यांनी सौ कौशल्याबाई भाऊराव कदम व सौ सरिता अवधूतराव कदम या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला गावामध्ये छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत अनवाणी राहील अशी प्रतिज्ञा घेऊन दहा वर्ष अनवाणी राहणाऱ्या अवधूतराव कदम यांची प्रतिज्ञा पूर्ण झाल्याबद्दल चितांगराव कदम सर यांनी त्यांच्या पायात वादत्राणी घालून प्रतिज्ञा सोडवयास लावले पुतळा अनावरणानंतर शिवव्याख्याते गजानन दिवसीकर यांचे छत्रपती शिवरायावरील कीर्तन संपन्न झाले
त्यानंतर महाप्रसाद होऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली सदर पुतळा अनावरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कदम, गुणवंत सूर्यवंशी व शिवाजी शिंदे यांनी केले छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण गाव सजवण्यात आले होते पुतळ्याचा परिसर आर्किटेक्चर नेहा गणपत कापसे पुणे यांनी मोफत डिझाईन केले संपूर्ण सोहळ्याला दैदिप्यमान करण्यासाठी शिवप्रतिष्ठान समिती मार्लेगाव व समस्त गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.





Social Plugin