Ticker

6/recent/ticker-posts

दुचाकी चोरटे जेरबंद, उमरखेड पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.



बाळासाहेब पवार प्रतिनिधी 

उमरखेड शहरातील शिवाजी वॉर्डातील शिवाजी बोबडे यांच्या घरासमोर असलेली दुचाकी दि. 2 जून रोजी रात्रीच्या सुमारास चोरी गेली होती. बोबडे यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासात घेतला. दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी रात्री गस्तीच्या दरम्यान ढानकी बायपास रोड येथून शिताफीने एका चोरट्याला पकडले, तर दुसऱ्या चोरट्याला विनक्रमांकाच्या दुचाकी सह करोडी रोड वरील कॅनॉल जवळ पकडले

. सदर कारवाई दि. 14 रोजी रात्री करण्यात आली. यात आरोपी दीपक ठाकरे रा. राजेंद्र प्रसाद वार्ड उमरखेड व शेख अनिस शेख अजिस रा. धाणकी असे अटकेतील आरोपीची नावे आहेत. यातील आरोपी दीपक यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर दुसऱ्यास अटक करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सागर इंगळे, बीट जमादार दयानंद जांभळे, पो. कॉ. कैलास नेवकर करीत आहेत.