Ticker

6/recent/ticker-posts

मोर्चा संदर्भात समितीतर्फे निवेदन सादर


प्रतिनिधी संजय भरदुक मंपीर 

   वाशीम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बंधू, भगिनी यांना कळविण्यात येते की, वाशीम जिल्ह्यातील तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या प्रमुख मागण्या १) सन २००६ ते २०१३ मधिल सरळ खरेदी धारक प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना सन २०१३ च्या कायद्याप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळावे २) नोकरी विषयक समस्या.    या सरकारच्या काळातील शेवटचे अधिवेशन सध्या चालू असून या काळात दि. ३ जुलै २०२४ रोज बुधवार ला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम च्या वतीने मोर्चा चे आयोजन केले आहे. 

              मोर्चा चे परवानगी करीता मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना प्रकल्पग्रस्त समिती च्या वतीने निवेदन दिले आहे. या सरकारच्या काळातील हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे व शासन दरबारी आपले काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने यावेळी या मोर्चाला जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त शेतकरी बंधू, भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती वाशीम यांनी केले आहे.