बाळासाहेब पवार प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी बाजी मारत महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कदम यांचा लाखाच्यावर मताधिक्क्याने पराभव केला. तर वंचित चे डॉ. बी. डी. चव्हाण यांनी दीड लाखाच्या वर मतदान घेतले, उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला जनतेने पहिल्या क्रमांकाची पसंती दिली. महायुतीला दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली तर वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या क्रमांकाचे मते घेतली.
एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात असे जरी असले तरी आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या उमरखेड शहरात मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पारंपारिक मतदानाला महाविकास आघाडीने सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे. उमरखेड नगरीत महाविकास आघाडीने 11774 मते घेत आघाडी घेतली, तर महायुती 9309 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहीली आणि वंचित चा मात्र यावेळी उमरखेड नगरीत फारसा प्रभाव दिसून आला नाही.
वंचितला केवळ 418 मतांवर समाधान मानावे लागल्याने वंचित बहुजन आघाडीच्या पारंपारिक मतदानाला महाविकास आघाडीने सुरुंग लावण्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. या उलट ग्रामीण भागात मात्र अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारास चांगले मते मिळाल्याचे दिसले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली ही निवडणूक सुरुवातीला तिरंगी होईल असे मत जाणकार व्यक्त करीत होते, परंतु वंचित चा नियोजन शून्य प्रचार , कार्यकर्त्याची नसणारी फळी, पक्षा बाहेरील कार्यकर्त्यांना नियोजनाची दिलेली जबाबदारी, दुखावलेला निष्ठावान कार्यकर्ता, ना सभा, ना रॅली या मुळे उमरखेड मध्ये वंचित ची हवाच दिसली नाही. त्यामुळे ही लढत दुरंगी झाली. त्यामुळे वंचित आघाडीचे पारंपरिक मते आपल्याकडे खेचून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या पारंपरिक मतदानाला सुरुंग लावल्याचे बोलल्या जात आहे.





Social Plugin