Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेड मतदार संघाचा कायापालट करणार



                            खासदार नागेश पाटील आष्टीकर महविकास आघाडीच्या वतीने सत्कार

उमरखेड मधून मतदारांनी मला सात हजाराची लीड दिली. त्यामुळे मी उमरखेड वासियांचा खूप ऋणी आहे. या पाच वर्षात मी मतदार संघाचा कायापालट करणार व विकास कामांसाठी निधी खेचून आणणार अशी ग्वाही खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली. महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी खासदार आष्टीकर बोल होते, लोकसभेच्या निवडणुकीत माझा विजय झाला मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकून मला खासदार केले. विरोधकांनी पैशाचा बेसुमार वापर केला पण जनतेने पैशाला बळी न पडता माझ्यावर प्रेम दाखवून मला मतदान करून विजयी केले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नंदकिशोर अग्रवाल होते तर शिवसेना उभाठा चे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, प्रा मोहन मोरे, माजी आमदार विजयराव खडसे, काँग्रेस प्रदेश सचिव तातू भाऊ देशमुख, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती राम देवसरकर, माझी जी.प. अध्यक्ष रमेश चव्हाण, दत्तराव शिंदे, साहेबराव कांबळे, बाळासाहेब चंद्रे, एडवोकेट बळीराम मुटकुळे, इनयातुल्ला जनाब, कृष्णा पाटील, एडवोकेट संतोष जैन, राजेश खामनेकर, प्रज्ञानंद खडसे मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन उभाठा तालुकाप्रमुख सतीश नाईक यांनी, तर डॉ. अजय नरवाडे यांनी आभार मानले. या सत्कार समारंभाला महा विकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.