संजय भरदुक प्रतिनिधी मंपीर
मंगरूळपिर तालुक्यातील चिखली येथील संत झोलोबाबा यांच्या पालखी सोहळ्याचे २५ जून मंगळवारला पंढरपूर साठी प्रस्थान होणार असून १४ जुलैला पालखी पंढरपूरला पोहचणार आहे.दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने चिखली येथून पंढरपूरला जात असते. यावर्षी २५ जून मंगळवारला चिखली येथून मार्गस्थ होणार आहे तरी खालीलप्रमाणे मार्गस्थ राहणार आहे.दुपारी पिंप्री (अवगण) नंतर संध्याकाळी पांडव उमरा येथे मुक्कामी राहील.२६ जून बुधवार ला दुपारी वाशिम व संध्याकाळी कनेरगावला मुक्काम राहील.
२७ जून गुरूवार ला दुपारी कनेरगाव व संध्याकाळी माळहिवरा हनुमान मंदिर मुक्काम राहणार आहे.२८ जून शुक्रवार ला दुपारी हिंगोली व संध्याकाळी हिवरा जाट जागॄत हनुमान मंदिर येथे मुक्कामी राहील.२९ जून शनिवार दुपारी औंढा नागनाथ व संध्याकाळी काळी जवळा बाजार येथे पालखी चा मुक्काम राहणार आहे.३० जून ला रविवारी दुपारी आडगाव रंजे व संध्याकाळी झिरो फाटा येथे मुक्कामी राहून १ जुलैला सोमवार दुपारी पालखी देवपाटी त्रिपारा हनुमान मंदिर व संध्याकाळी कारेगाव परभणी मुक्कामी राहणार आहे.२ जुलै मंगळवारी दुपारी तरोडा (राजे संभाजी विद्यालय ) येथे व संध्याकाळी देठणा (हनुमान मंदिर) मुक्कामी राहणार आहे.३ जुलै बुधवार ला दुपारी दुसलगाव पंचवटी व संध्याकाळी गंगाखेड येथे मुक्कामी राहून.४ जुलै गुरूवार ला दुपारी वैतागवाडी व संध्याकाळी उखळगाव मुक्काम राहणार आहे.
५जुलै शुक्रवार ला दुपारी कनेरगाव व संध्याकाळी रामरक्षा गोरक्षण रामटेकडी येथे मुक्कामी राहून ६ जुलै शनिवार ला दुपारी अंबाजोगाई व संध्याकाळी तुकाराम महाराज संस्थान डिघोळ आंबा येथे मुक्कामी राहणार आहे.७ जुलै रविवारला दुपारी सावळेश्वर (पैठण) व संध्याकाळी वडगाव राम ई सुफ (महादेव मंदिर) येथे मुक्कामी राहणार आहे.८ जुलै सोमवार दुपारी हासेगाव व संध्याकाळी परतापूर येथे मुक्कामी राहील.९ जुलै मंगळवारी दुपारी जिजाऊ मंगल कार्यालय येरमाळा व संध्याकाळी विठ्ठल मंदिर शिराळे येथे मुक्कामी राहणार आहे.१० जुलै बुधवार ला दुपारी कुसळम व संध्याकाळी कानिफनाथ मंदिर भगवान बार्शी येथे मुक्कामी राहणार आहे.११ जुलै गुरूवार ला दुपारी आलेगाव भगवान बार्शी व संध्याकाळी रिधोरा येथे मुक्कामी राहून १२ जुलै शुक्रवार ला दुपारी हनुमान मंदिर माढा व संध्याकाळी उपराई येथे मुक्कामी राहणार आहे.१३ जुलै शनिवार ला दुपारी शेटफळ व संध्याकाळी रोपळे येथे मुक्कामी राहून १४ जुलै रविवारला रोजी पंढरपूरला पोहचणार आहे या दिवशी श्री मोरे माऊली संस्थान मठ म्हसोबा मंदिरासमोर पंढरपूर शेगाव दुमाला येथे पालखी मुक्कामी राहणार आहे तरी ज्या भाविकांना पालखी सोबत जावयाचे आहे त्यांनी खालील सेवेकरी श्री बबनराव सावके, श्री धर्मराज अव्हाळे, श्री बबनराव अवगण, श्री रवि सावके यांच्याकडे नोंदणी करावी असे आवाहन श्री संत झोलोबाबा पालखी पदयात्रा समिती श्री संत झोलोबाबा संस्थान चिखली ता.मंगरुळपिर जिल्हा वाशिम यांनी कळविले आहे.





Social Plugin