Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर तालुक्यामधे दमदार पावसाची प्रतीक्षा


संजय भरदुक प्रतिनिधी मंपीर

मंगरुळपिर तालुक्यातील काही भागात मॄग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली.तर काही भागात जसे की गिंभा, मोहरी,जनूना, कोठारी शिवारात ढगफुटी झाली आहे गावात घरामध्ये पाणी साचले बरेच नुकसान झाले आहे.तर काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाल्याने पेरणी करावी का नाही संभ्रमात आहेत.सोयाबीन,तुर,व कपाशी लागवड कडे लोकांचा कल वाढला आहे.

मॄग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने मुंग, उडीद चा सुध्दा पेरा वाढणार आहे तसेच काही शेतकरी खरीपाच्या पेरणी साठी आवश्यक असलेले बी-बियाणे व खते विकत आणण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी पेरणी ला सुरूवात केली आहे तर काही भागात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत चांगल्या पावसाची वाट पाहताना दिसून येत आहेत .