Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव चे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री सेवागिरी विद्यालय,         पुसेगावने  उज्ज्वल यश संपादन केले .विद्यालयातील इयत्ता आठवीचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले 1)ओंकार भंडलकर(246) राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक (जिल्ह्यात सहावा),2) साईशा देवकर  (218),3) मुग्धा साळुंखे (202)  ,4) शर्वरी पवार (196),5)श्रेया कदम (192) त्याचप्रमाणे इयत्ता पाचवीतील वेदांत दळवे (258  )हा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाला आहे.

                   तसेच रयत शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात येणारी रयत प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी या परीक्षेत देखील विद्यालयाने उत्तुंग यश संपादन केले आहे. इयत्ता सातवीतील सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत यामध्ये  1)असीम इनामदार  (158) 2)सिद्धी देवकर(146 ) 3)सिद्धी जाधव (136), 4) ईश्वरी जाधव (136) 5)सायना जगदाळे( 130 ),6)अनन्या जाधव (130)    या यशाबद्दल स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री.संतोष  मुगुटराव जाधव, स्कूल कमिटी सदस्य मोहन तात्या जाधव ,स्कूल कमिटी सदस्य श्री संतोष जाधव विविध समित्यातील अध्यक्ष ,सचिव, सदस्य ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .सावंत ए .बी.,पर्यवेक्षक श्री .सावंत  एस.डी.,विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षिका ,सर्व पालक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला .उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.