पुसेगावात विठूनामाचा गजर : भाविकांची अलोट गर्दी
बुध, दि. [प्रकाश राजेघाटगे]
श्री सेवागिरी महाराजांची श्रीक्षेत्र पुसेगाव-पंढरपूर पायी पालखी दिडी सोहळ्याचे पंढरपूरकडे सोमवार दि .८ रोजी सकाळी १०.१५ वाजता प्रस्थान झाले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात ग्रामस्थांनी येथील शासकीय विद्यानिकेतन येथे निरोप दिला.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज ट्रस्टतर्फे यावर्षीही पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज यांनी पालखी श्री सेवागिरी महाराज, संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे व श्री सेवागिरीच्या पादुकांचे पालखी दिंडी रथाचे विधीवत पूजन केले. यावेळी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव , विश्वस्त डॉ . सुरेश जाधव , संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, , संतोष वाघ, सचिन देशमुख, , गौरव जाधव तसेच , सरपंच घनशाम मसणे , उपसरपंच विशाल जाधव , सचिव विशाल माने , माजी चेअरमन ,शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, विविध मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री सेवागिरी मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर पायी दिंडी सोहळ्यातील फुलांच्या माळांनी सजविलेला दिडी रथ पुसेगाव बाजारपेठेतून मिरवणुकीने एस.टी. बसस्थानकावरील शिवाजी चौकात आला. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविक व ग्रामस्थानी मनोभावे पालखी रथाचे प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेतले. शिवाजी चौकात वारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकाराम महाराज, श्री सेवागिरी महाराजांचा जयघोष, अभंगच्या तालावर वारकरी भक्तारसाच्या वातावरणात न्हाऊन गेले होते . देहभान विसरून सर्व वारकरी सेवागिरी, विठुनामाच्या गजर करीत नाचत होते. यावेळी वारकरी महिला व पुरुषांनी फुगड्या खेळल्या. श्री सेवागिरी महाराज की जय च्या जयघोषात, अभंग, बोल-ताशा, लेझीम, बँडपथक, तुतारी व झांजपथक यांच्या निनादात मोठ्या भक्तमय व उत्साही वातावरणात श्री सेवागिरी पालखीस सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने वैष्णवांचा मेळा रंगू लागला. त्यावेळचे वातावरण सेवागिरीमय झाले होते. परिसर, विठोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली सेवागिरी महाराज की जय याने दुमदुमला होता.
येथील छत्रपती शिवाजी चौकात वारकऱ्यांच्या फुगड्या, गोल रिंगण, पारंपरिक खेळ सादर केले. या वातावरणावर उपस्थितांनी ठेका धरला. कपाळी वैष्णवांचा टिळा बुका डोक्यावर मुळशी, डोईवर पागोटे, हातात टाळ, मृदंग, विगा, चब्यड़ा एकताका आणि मुखावरचा भाव असा पुसेगावसह पवारवाडी, खातगुण, बुध, आदी भागातील हजारो वारकऱ्यांचा मेळा पुसेगावात झाला.
Social Plugin