Ticker

6/recent/ticker-posts

पद्मभूषण डॉ . पां वा . सुखात्मे समाजभुषण पुरस्कारने श्री शिवशंकर चापुले सन्मानित .



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

सर्वोदय सामाजिक संस्था काटेवाडी बुध व श्री नागनाथ विद्यामंदिर बुध यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजभूषण पुरस्कार सोहळा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता .यावेळी पर्यावरण प्रेमी शिवशंकर चापुले लातूर यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .पाच हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ व आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला .उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम , डॉ .पां .वा .सुखात्मे,शिक्षण महर्षी डॉ .बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले . तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संस्थेची प्रार्थना व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली . 

उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सर्वोदय सामाजिक संस्था काटेवाडी बुध चे संचालक वश्री नागनाथ विद्यामंदिर बुध मधील शिक्षक व प्राचार्य यांच्या वतीने आंब्याचे रोप  व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी विद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रास्ताविकामध्ये डॉ .सुखात्मे यांचे कार्य सर्वोदय सामाजिक संस्था करत असलेले कार्य यांच्या बद्दल माहिती सांगितली .तसेच सामाजिक कार्यकर्ते मा .परशुराम घोरपडे यांनी समाजभिमूख कार्य करणाऱ्या व्यक्तिची योग्य दखल घेऊन सन्मान केला मनोगत व्यक्त केले .प्रगतशील शेतकरी मा . रविराज लाड यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे जगवणे व लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात मार्गदर्शन केले .शिवशंकर चापुले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की आत्तापर्यंत तीनशे प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतीच्या बियांचे लागवड करून रोपण करून मोफत त्याचा प्रचार व प्रसार करून ते जगण्यासाठी व झाडे लावण्यासाठी प्रयत्न केले आहे .

 त्यामुळे त्या वनस्पतीचे महत्व समाजापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहेत . पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी विविध वनस्पतीची माहिती घेऊन व त्याचे औषधी महत्त्व लक्षात घेऊन वनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले . अत्यंत साधे व्यक्तिमत्व असलेले शिवशंकर यांनी आपल्या कार्याचा आढावा उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना सांगितला .विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये येणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या सोडवण्यासाठी वृक्षारोपण करणे व त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे याचा बोध घ्यावा असे मत मांडले . प्राचार्य डॉ .संजय कांबळे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात शिवशंकर चापुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव आहे असे म्हटले व समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व त्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करावे तसेच सवोदय सामाजिक संस्था करीत असलेले कार्य अतिशय कौतुकास्पद असून या संस्थेचे संस्थापक जीवन इंगळे व त्यांचे सर्व संचालक करत असलेले समाजभिमुख कामासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या .

यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा दहावी ,एन एन . एम .एस . परीक्षेत तसेच मंथन परीक्षेत उज्वल हे संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते आंब्याचे रोप देऊन व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मा .शुभांगी कोरडे सरपंच काटेवाडी, मा . मंगेश नलवडे उद्योजक पुसेगाव ,शिवाजीराव लावंड उपसरपंच  मा . नितीन गाडे मा .राजेंद्र भिसे .बाबासाहेब इनामदार व डॉ .संदीप माळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .दीपमाला जगदाळे व सौ प्राजक्ता इंगळे, यानी केले . तसेच सौ लक्ष्मी इंगळे, रूपाली इंगळे ह्या ही कार्यक्रमास उपस्थित होत्या . या कार्यक्रमाचे स्वागत विद्यालायाच्या वतीने श्री भगवान सरवदे यांनी केले . व कार्यक्रमाचे आभार मा .जीवन इंगळे काका नी मानले . यावेळी शिवशंकर चापुले पांढऱ्या पळसाच्या बिया संस्थेला लावण्यासाठी जीवन इंगळे यांच्याकडे दिल्या यावेळी विद्यार्थी, शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला .