अंबड /प्रतिनिधी आकाश जळके
भोगगाव येथील असंख्य युवकांनी आपल्या गावच्या रखडलेल्या विकासासाठी प्रस्थापितांच्या दडपशाहिच्या राजकारणाला कंटाळून आज भाजपात प्रवेश केला. घाटगे साहेबांमुळे आम्ही जागरूक झाले असून आता आम्ही दडपशाहीचे राजकारण संपवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व युवकांचे घाटगे साहेबांनी पक्षात स्वागत करून त्यांचा सत्कार केला. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा शब्द दिला. तसेच लवकरच या युवकांमधील शिक्षिताना रोजगार देण्यासाठी साहेब प्रयत्न करणार आहे. यावेळी भगवान जाधव, विकास वाघमारे, भीमराव आवटे, रंगनाथ जंगले, बालाजी कचरे ,बाबासाहेब पंडूरे, प्रदीप सोनवणे, आमेर पठाण, सुमित तूपसौंदर, राहुल तूपसौंदर, योगेश कचरे, राहुल खरात, अनिरुद्ध खरात, किरण विठोरे , सिद्धार्थ तूपसौंदर, राजेश मुळे यांनी प्रवेश केला.





Social Plugin