प्रतिनिधी -मोहन गुरव
उमरगा तालुक्यातील सुपतगावसह परिसरातील शेतशिवारामध्ये मृग नक्षत्रात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे सोयाबीनच्या पिकांची कोळपणीची कामे वेगाने सुरु झाल्याने शेत शिवारामध्ये शेतकरी सोयाबीन पिकाच्या अंतर मशागतीत मग्न आहेत.
यंदा पाऊस समाधानकारक असला तरी सोयाबीनच्या कोवळ्या पिकाच्या पानावर लष्करीअळीने हल्ला केला असून पानाची चाळणी होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय सध्या पावसाने उघडीप दिल्याने पिक तणविरहित करण्यासाठी शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने कोळपणी करण्यासाठी शेतकरी पसंती देत आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने कमी दिवसात, कमी खर्चात पैशाची बचत करून शेती व्यवसाय केला जात असला तरी मात्र, आजही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत आहेत.
शेतशिवारात सोयाबीनचे पिक समाधानकारक असल्याने बैल जोडीच्या मशागतीसाठी मोठी मागणी होत आहे. ज्यांच्याकडे बैल जोडी आहे असे काही शेतकरी घरच्या शेतातील सोयाबीनची कोळपणी करून इतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिवसाला दोन हजार रुपया प्रमाणे किंवा एकरी पाचशे या प्रमाणे कोळपणी करून देत आहेत.
Social Plugin