Ticker

6/recent/ticker-posts

महामार्गावर सर्वसामान्यांचं बळीचसत्र सुरूच

दुकान बंद करून घरी येत असतांना सायकलस्वाराला अज्ञात वाहणाने उडवले, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू, मलकापूर तालुक्यातील धानोरा उड्डाणपुलावरील घटना

मलकापूर :दुकान बंद करून घरी येत असतांना सायकलस्वाराला अज्ञात वाहणाने भरधाव वेगात येऊन पाठीमागून धडक दिली.या अपघातात ६० कवर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर धानोरा उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. दिलीप नामदेव तायडे (वय ६०) वर्ष असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

ते तालुक्यातील वाघुड येथे परिवारासह वास्तव्यास आहे.दिलीप नामदेव तायडे हे राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वडनेर नजीकच्या हॉटेलजवळ सलून दुकान चालवितात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी ५:३०च्या सुमारास ते दुकान बंद करून घरी परतीच्या वाटेवर निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरून धानोरा उड्डाणपुलावर पाठीमागन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत दिलीप तायडे यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटना घडल्यानंतर धडक देणाऱ्या वाहनचालक पसार झाला. या घटनेची माहिती कळताच वाघुड येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण पोलिस स्टेशनचे एएसआय उल्हास मुके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविला. मलकापूर ग्रामीण पोलिस सध्या धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.