भारत शिंदे (ग्रामीण प्रतिनिधी)
ता.२०जुलै २०२४.मोकभणगी येथील म. वि. प्र संचलित महात्मा फुले हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय मोकभणगी या विद्यालयात व्यासपोर्णिमा अर्थातच गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत विद्यालयातील शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी घेण्यात आला. शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून कुमारी. तनुजा गौतम शेवाळे हिची तर उपमुख्यमंत्री म्हणून कुमार. अविनाश गंगाधर खैरनार याची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाची नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारी. तनुजा गौतम शेवाळे हि होती.महर्षी व्यास मुनी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व सेवक व मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी शिंदे,चैताली शेवाळे, मोनिका गांगुर्डे व पूजा पवार यांनी गुरूंची महती वर्णन केली. विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती.अहिरे व्ही. आर यांचे पूजन व सत्कार विद्यालयाची मुख्यमंत्री कुमारी. तनुजा गौतम शेवाळे हिने केले. व इतर सेवकांचा सत्कार सर्व विद्यार्थ्यांनी मिळून केला.
विद्यालयाच्या कला शिक्षिका श्रीमती. पाटील के.बी यांनी आपल्या मनोगतात गुरूंचे महत्त्व वर्णन करत भारतातील गुरु शिष्य परंपरा वर्णन केली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अहिरे व्ही.आर यांनी आपल्या मनोगतात गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो,गुरुचे आपल्या जीवनातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचे जीवन भरकटलेले असते.गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात.गुरूने दिलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात करावा असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतात दिला. विद्यालयातील उपशिक्षक श्री वाघ सर यांनी "ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला "हे गीत आपल्या सुमधुर आवाजात गायन केले. कार्यक्रमाची अध्यक्ष कुमारी तनुजा शेवाळे हिने आपल्या मनोगतात गुरुचे महत्व सांगितले. गुरु आपल्या जीवनात वेगवेगळी रुपे घेऊन येतात व आपल्याला मार्ग दाखवतात असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी शेवाळे हिने केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.






Social Plugin