Ticker

6/recent/ticker-posts

घुंगर्डे हादगाव येथे मुलगी वाचवा मुलगी शिकवा जनजागृती


बंडु शिंगटे 

घुंगर्डे हादगाव 

 19 जुलै 2024 रोजी, शुक्रवार मुलगी वाचवा जनजागृती उपक्रमाने  जि.प.प्रा.शाळा.घुंगर्डे हादगाव ,केंद्र पाथरवाला बु ता.अंबड जि.जालना येथे शाळेत जाणाऱ्या मुलींना शैक्षणिक साहित्य देण्याचा  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

      मुलगी वाचवा जनजागृती उपक्रम डॉ. सतीश साखरे यांनी  मुलीला वाचवण्यासाठी तसेच  मुलीला शिक्षित, सक्षम आणि उन्नत करण्यासाठी  सुरू केला आहे. त्यांच्या टीमने आज या शाळेतील सुमारे 100  पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. 

  कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सतीश साखरे यांचे स्त्री-पुरुष समानता आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व या विषयावर छोटेखानी व्याख्यान झाले.या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कांताभैय्या शिंदे ,सदस्य संतोष धावडे,  शिक्षक सुनील हेलवाडे, आप्पासाहेब उगले, देविदास नागरगोजे, दिलीपकुमार खराद,वैभव पवार, ज्ञानेश्वर पवार श्रीमती अनिता गावडे, श्रीमती मनीषा चव्हाण,सोपानसिंग पवार ,ज्ञानेश्वर म्हस्के,ज्ञानेश्वर डोबळे, बंडू शिंगटे,अण्णासाहेब एडके,डॉ श्रद्धा साखरे, शार्वी साखरे, या सर्वानी उपस्थीती लावली