Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राधिका बोराटे ची निवड .



बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुधची विद्यार्थिनी कु राधिका संतोष बोराटे इयत्ता नववी हिने नुकत्याच पार पडलेल्या फलटण येथे जिल्हास्तरीय थांग ता मार्शल आर्ट या स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवून बेस्ट फायटर ट्रॉफी मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . वर्धा या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहेत . 

राज्यस्तरी स्पर्धेत निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य  अंकुश भांगरे  ,पर्यवेक्षक संजय कांबळे  तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या . तसेच बुधच्या सरपंच सौ सुजाता बोराटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयसिंह राजेघाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, माजी प्राचार्य शेखार घाटगे, पत्रकार प्रकाश राजेघाटगे, शाळा व्यवस्थान समितीचे सदस्य , माता पालक संघाचे सदस्य, तसेच बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ, विद्यार्थी यांनीही राधिकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . राधिकाला अजित पाटील सरांचे मार्गदर्शन मिळाले तसेच प्रा . दत्तात्रय काळुखे ,नाना दडस सर यानीही  मार्गदर्शन केले