बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
भारत भूमीच्या रक्षणार्थ कारगिल युध्दात शहीद झालेले ललगुण येथील वीर सैनिक सुभेदार कृष्णात नारायण घाडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या युध्दस्मारकाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती माजी जि. प. सदस्य मानाजीकाका घाडगे यांनी दिली.
शहीद कृष्णात घाडगे यांच्या युद्धस्मारकाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मेजर जनरल अनुराग विज, ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन, जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, महसूल उपायुक्त नासीर मणेर, ब्रिगेडियर राजेश गायकवाड, मेजर आनंद पाथरकर, टेरिटरी मॅनेजर राजकुमार सिंह यांच्या उपस्थितीत होणार आहे .
सदर कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन विजय घाडगे आणि आजीमाजी सैनिक संघटनेने केले आहे.
Social Plugin