बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर योग्य केला तर तो संस्कारक्षम बनू शकतो , असे प्रतिपादन प्राचार्य डी. एन . गोफणे यांनी केले पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी ज्युनि. कॉलेजमध्ये पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली . त्यावेळी गोफणे बोलत होते .
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता पालक शिक्षक सहविचार सभा महत्त्वाची असते .चांगली पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांवरती लक्ष असणे आवश्यक आहे . ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो उच्च ध्येय प्राप्त करू शकतो असे मत प्राचार्य गोफणे डी .एन यांनी मांडले . यावेळी कॉलेजचे पर्यवेक्षक आर.एन. जाधव , विभागप्रमुख जे. बी . जाधव यांनीही पालकांचे उद्बोधन केले .तसेच पालकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्राध्यापक ए . एच. शेंडे यांनी प्रास्तविक केले. पालकांनी विद्यार्थ्यांना कमी न लेखता उच्चशिक्षण देवून नवनविन वाटा शोधल्या पाहिजेत असे मत प्राध्यापक श्री तारळकर सर यांनी आपल्या भाषणात मांडले .प्रा. सौ. लावंड मॅडम यांनी शिक्षकांची ओळख तसेच कॉलेज मधील उपक्रमांची माहिती दिली . प्रा. श्री चव्हाण एस. बी. यांनी आभार मानले तर सौ. जाधव एस. व्ही. यांनी सूत्रसंचालन केले.





Social Plugin