प्रतिनिधी --संजय भरदुक मंपीर
मंगरूळपीर--मंगरूळपीर तालुक्यातील ग्रामीण भागातील बेलखेड येथील रहिवासी निर्मल गजरे यांचा मुलगा जेईई मुख्य परीक्षेत संपूर्ण भारतातून पहिला आलेला निलकॄष्ण गजरे यांचा २२ जुलै रोजी तहसील कार्यालयात सत्कार करण्यात आला. निलकॄष्ण हा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून जेईई या परीक्षेत देशातून पहिला येवून वाशिम जिल्ह्याचे नावलौकिक वाढविले आहे.
त्यांनी मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील अभ्यास करण्यार्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.जेईई ही परीक्षा अत्यंत कठीण असून तसेच लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसत असताना सुद्धा निलकॄष्ण याने अथक परिश्रम व जिद्दीने अभ्यास करून प्रथम येण्याचा मान पटकावला.या निमित्ताने तहसील कार्यालय मंगरूळपीर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार करतांना उपविभागीय अधिकारी श्री राजेन्द्र जाधव साहेब व तहसीलदार शितल बंडगर मॅडम, ठाणेदार सुधाकर आडे साहेब, नायब तहसीलदार राजेश ढोंबळे साहेब,नायब तहसीलदार रवि राठोड साहेब यांनी त्याच्या सत्कार केला आहे.





Social Plugin