. गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
भारतीय कृषी विमा कंपनी ही केंद्र शासनाच्या मालकीची कंपनी देशभरात शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण देणारी अग्रगण्य कंपनी आहे.केंद्र शासनाच्या उपरोक्त पत्रानुसार जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशभरात सप्टेंबर 2024 पर्यंत 80 कोटी तर मार्च 2025 अखेर 140 कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प भारतीय कृषी विमा कंपनीने जाहीर केला आहे.
ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी दि.23/07/2024 रोजी कारंजा तालुक्यातील पसरणी येथील श्री.बाबासाहेब धाबेकर विद्यालयात तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपणासाठी श्री.बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील शिक्षक वृद,मुख्याध्यापक बी.बी.पप्पूवाले.व पी.एम गुजर, एस पी नेमाने, अनिता भगत, आर बी दाभेकर ,एम डी चाकुलकर ,एन यु घाटे , एस एल बोर्डे ,अविनाश भगत,अनिल व शाळेतील सर्व विद्यार्थी आणि गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने शाळेच्या आवारामध्ये 50 रोपांची लागवड करण्यात आली.
तसेच पसरणी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच व ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले यावेळी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे तालुका व्यवस्थापक तथा तक्रार निवारण अधिकारी नितेश वाघ व तालुका समन्वयक जयेश्वर बोबडे, प्रवीण नेमाने , गौरव गावंडे उपस्थित होते.





Social Plugin