Ticker

6/recent/ticker-posts

गुणवंत विद्यार्थी व सोबत पालक यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न



गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार संघ कारंजा व स्व. आशादेवी चव्हाण बहुद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक महेश भवन येथे गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. महेश चव्हाण व डॉ.सौ. निकिता चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सचिवअमोल पाटणकर गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने वन पर्यटन केंद्राचे अमित शिंदे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडूभाऊ इंगोले जका खान फिरोज शेकूवाले गजानन आमदाबादकर व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते याप्रसंगी दहावी बारावी स्पर्धा परीक्षेत सुयश प्राप्त करणाऱ्या शंभर वरगुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांचा इतर डॉ. आणि पदवीधर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला तसेच शहरी व ग्रामीण भागातील नामांकित शाळेला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणाऱ्या सर्व शाळांच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दहावी बारावी नंतरचे विश्व या विषयावर आशिष वानखडे यांचे मार्गदर्शन झाले तरी गुणवंत विद्यार्थी त्याचे पालक गुरुजन व निमंत्रकांनी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ

इंगोले जिल्हा उपाध्यक्ष विजय भड जिल्हा सचिव सागर अंभोरे सल्लागार सुधाकर गर्जे तालुकाध्यक्ष आरिफ पोपटे उपाध्यक्ष रामदास मिसाळ प्रा दिनेश रघुवंशी तालुका सचिव महेंद्र गुप्ता निलेश मुंदे दामोदर जोंधळेकर पवन गुप्ता रवींद्र इंगळे गुप्ता कुमारी मयुरी गुप्ता सौ उषा नाईक मोनाली गणवीर श्रवण किनीकर डॉक्टर गुणवंत राठोड उमेश देशमुख विजय खंडार अजय काकडे श्यामसुंदर अंकुश शेडोकार यांच्यासह महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ शाखा चे इतर सदस्य यानी कार्यक्रमा यशस्वी करण्या। करिता अधिक परिश्रम केले, या कार्यक्रमाचे प्रस्तावित बंडूभाऊ इंगोले यांनी केले तर सूत्रसंचालन पापडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय भट सर यांनी केले या कार्यक्रमाने बहुसंख्य प्रेक्षकांची उपस्थिती होती