प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जळगाव पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत असून चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांचा उत्साह वाढवत आहेत.
यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना अधिक पाठबळ व काम करण्याची ताकद मिळाली असून अधिक जोमाने विविध गुन्ह्याचा तपास करून गुन्हेगार यांना अटक करणे तसेच चोऱ्या घरफोड्या करणाऱ्या आरोर्पीकडून मुद्देम ाल जमा करून त्यांना अटक करणे व गुन्हेगारांना केलेल्या गुन्ह्यात योग्य रित्या तपास करत जास्तीत जास्त कायद्यानुसार कलम लावून त्यांना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणे असेच कार्य चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोऊनि सुहास आव्हाड, पोऊनि घुले साहेब, पोहे कॉ योगेश बेलदार, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना महैद्र पाटील, पोकों विजय पाटील, पोकॉ निलेश पाटील, पोकॉ अमोल भोसले पोकॉ प्रकाश पाटील, पोकॉ नदंकुमार महाजन, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ शरद पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकों समाधान पाटील यांनी विविध गुन्ह्यात आरोपींना अटक करून मुद्देमाल जमा केला त्यांच्या या सर्व कामाची दखल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डी वाय एस पी श्री अभयसिंग देशमुख यांच्या उपस्थितीत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संदिप पाटील व पोलीस कर्मचारी यांचा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला.





Social Plugin