बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील राजापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण च्या कृषीदुतानी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक तन व्यवस्थापन सबंधित मार्गदर्शन केले कृषीदुतान मार्फत वाढत्या तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांपासून होणाऱ्या आतोनात नुकसानीस बळी न पडता एकात्मिक तन व्यव्थापनाचे तंत्र अंगिकृत करणे काळाची तसेच आर्थिकदृषटया फायद्याचे ठरते यामध्ये तन नियंत्रणाचे पद्धती जसे की जैविक, रासायनिक, भौतिक, इत्यादींचा समावेश होतो. यातून पर्यावरणाचा समतोल राखला जातो, आणि पद्धतशीर तन नियंत्रण केले जाते. यावेळी श्रीरंग घनवट सर, अमोल झगडे, गौरव घनवट, बाबू घनवट, विजय बोराटे ,अक्षय घनवट, व तसेच इतर शेतकरी उपस्थित होते.
यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत अथर्व देवकर, सत्यजित धायगुडे, यश निकम, रोहन बरबोले, पुष्कर बिसेन, साहिल भोसले, सुयोग भोसले, ह्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.





Social Plugin