Ticker

6/recent/ticker-posts

बळीराजा प्रकल्प ग्रस्त संघर्ष कृती समितीच्या महामोर्चास हजारोच्या संख्येने उपस्थिती



अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्प ग्रस्त मोर्चात सहभागी  जिल्हाधिकार्या मार्फत शासनास निवेदन सादर

 मंगरूळपीर  प्रतिनिधी संजय भरदुक

मंगरूळपीर :- बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम तथा विदर्भ संघटनेच्या वतीने प्रकल्प ग्रस्त शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा बळीराजा प्रकल्प ग्रस्त कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा विभागिय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे गूरूजी यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे, 

              प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मोर्चा ची सूरूवात दि. ३ जुलै रोज बुधवार ला सकाळी ११ वाजता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हारार्पन करुन करण्यात आली.  हा मोर्चा येथून पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बस स्टॅण्ड, ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत जावून तेथे सर्वांच्या उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी साहेब, व त्यांच्याच मार्फत शासनास निवेदन देण्यात आले,

     प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रमुख दोन मागण्या १)सन २००६ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सन २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळणे बाबत. तर दुसरी मागणी २) प्रकल्पग्रस्तांचे ५% हून आरक्षण १५% करण्यात यावे.तसेच महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय किंवा निमशासकीय सेवेत सामावून घेणे शासकीय नौकरी देणे शक्य न झाल्यास एक रक्कमी २० लक्ष रूपये देण्यात यावे. मागील पाच वर्षापासून वाशीम तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या वरील मागण्या संदर्भात अमरावती, आझाद मैदान मुंबई, हिवाळी अधिवेशन नागपूर येथे वाशीम तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा मोर्चा काढून शासनास निवेदन देण्यात आले होते. 

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी आंदोलन केले परंतु शासनाने आश्वासन शिवाय काही केले नाही.   वाशीम जिल्ह्यातील तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासन सतत दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज वाशीम येथे मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी तथा शासनास निवेदन देण्यात आले.

      यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवदास पाटील ताठे, बाबुसिंगजी पवार काका, भाऊसिंगजी राठोड, शिवाजी घुगे, मुख्तार पटेल, नंदकिशोर कांबळे, संजय भरदूक, संदीप गुल्हाने, यवतमाळ जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, अकोला जिल्हाध्यक्ष सौ. मनिषाताई चक्रनारायण, संतोष चक्रनारायण, रविंद्र श्रृंगारे, सुभाष गुल्हाने, संतोषराव भिसडे, राधेश्याम शिरसाठ, महादेव निंबोकार, गजानन जाधव, माणिकराव साऊतकर, रमेश पवार, पंडितराव मुसळे, काशीराम पाबळे, जयाजी भेंडेकर, पुंडलिक घुगे, गणेशराव रहाटे, रत्नाकर गंगावणे, ओम दुधे, गजानन पुसांडे, संतोष भेंडे , देविदास गंगावणे, महादेव भरदुक,राजू भरदुक,कोंडीराम ठाकरे,सह वाशीम येथील मोर्चात चार ते साडे चार हजार प्रकल्पग्रस्त महिला, पुरुष सहभागी झाले होते.

       शेवटी समारोपीय कार्यक्रम मध्ये संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, डॉ. सिद्धार्थ देवळे, नारायण विभुते, मुख्तार खान पटेल, राहुल वैद्य, गजानन शिंदे सर, जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे यांनी मनोगत व्यक्त केले.