Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.प्रा. शा.येवा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण


कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

पेवा - समावेशित शिक्षण अंतर्गत पेवा या गावात 1 ते 16 जुलैदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.जालना जिल्ल्यातील मंठा तालुक्यातील पेवा शाळेमध्ये एकूण ०३ विद्यार्थी दिव्यांग आढळून आले  आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांच्या आदेश व सूचनेनुसार समावेशित शिक्षण अंतर्गत शहरासह सर्व ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यात आले

.पेवा शाळेत डॉ. गोपाळ तुपकर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची सर्वेक्षणात माहिती जमा केली. दिव्यांग विदयार्थ्यांच्या सर्वेक्षणाची माहिती ऑनलाईन करण्यासाठी  महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी गुगल लिंक उपलब्ध करून दिली आहे. डॉ. गोपाळ तुपकर यांच्या पुढाकाराने सर्वेक्षण पूर्ण होऊन ०३ विदयार्थी दिव्यांग असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी  कार्यालय मंठा यांना कळविण्यात आले आहे. याकामी मुख्याध्यापक अशोक भावसार, प्रकाश नालेगावकर, ज्ञानोबा मुरमुरे , समाधान बोरुडे यांनी सहकार्य केले.