कोयना परिसरात 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का
पाटण, (दिनकर वाईकर )
कोयना धरण परिसरासह पोफळी परिसरात बुधवार दि. 17 रोजी दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार अंनत गुरव यांनी दिली. तसेच या भूकंपाच्या धक्क्याचा कोयना धरणास कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण विभागाकडून अविनाश जाधव यांनी दिली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या भिंतीपासून 13.6 किलोमीटर अंतरावर, हेळवाक गावाच्या पश्चिमेला 10 किलोमीटर अंतरावर आणि 15 किलोमीटर खोल होता अशी माहिती कोयना भूकंपमापन केंद्रावरून देण्यात आली आहे. हा भूकंप कोयना, पाटण, पोफळीसह पाटण, चिपळूण, रत्नागिरी, वारणा परिसर व तालुक्यातील काही ठिकाणी जाणवला.
.jpeg)




Social Plugin