नाविन्यपूर्ण उपक्रमाचा व गुणवत्तापूर्वक कार्याचा समारंभ पूर्वक गौरव
अंबड/प्रतिनिधी आकाश जळके
अहमदनगर येथील ध्येय उद्योग समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जामखेड येथील आदर्श इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षक अनिल विनायकराव भालेकर यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थी प्रिय असणारे शिक्षक म्हणून ओळख असणारे अनिल भालेकर आपल्या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनवण्यासाठी सदैव कार्यतत्पर असतात.कला, संस्कृती,क्रीडा,वकृत्व,विज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार तयार झालेले विद्यार्थी तालुका,जिल्हा,राज्य पातळीवर विजय ठरलेले आहेत.
जुन्या चालीरीती,रीती रिवाज, परंपरा व लोककलेवर आधारित त्यांचे लिखाण नेहमी लक्षवेधी ठरते. गोंधळी, बहुरूपी,पारंपरिक व्यवसाय करणार मेंढपाळ बांधव यांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इतिहास समस्या याबाबतचे त्यांचे विशेष लेख वाचकांना विशेष पसंतीस उतरत असतात.
विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी विविध उपक्रमाचे ते वेळोवेळी आयोजन करत असतात. लेझीम कला प्रकारात ते विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याबरोबरच मैदानी खेळामध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांमध्ये आत्मबळ विकास होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करत असतात. यापूर्वी देखील शैक्षणिक, सामाजिक,पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य पातळीवरील व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. या समारंभ प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनऊचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, उद्योजक नितीन एडके, ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष लहानु सदगीर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देत अनिल भालेकर यांचा गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल अनिल भालेकर यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. तसेच हा पुरस्कार सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी समर्पित केला आहे.





Social Plugin