Ticker

6/recent/ticker-posts

चिखली तालुक्यातील अंबाशीमध्ये घरासमोर खेळताना 10 वर्षीय चिमुकल्याचे अपहरण!



शेख बाबा शेख नूर (तालुका प्रतिनिधी लोणार)

चिखली तालुक्यातून अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे.घरासमोर खेळत असताना 10 वर्षीय चिमुकल्याचे अपहरण झाले.अंबाशी येथे काल 22जुलैच्या संध्याकाळी ही घटना उघडकीस आली याप्रकरणी अंबाशी येथील शेख हारून शेख गनी यांनी  चिखली पोलीस ठाण्यात 22 जुलैच्या संध्याकाळी  तक्रार दिली सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा मोहम्मद अरहान हा खेळत होता खूप वेळ उलटून गेला तरी अरहान घरी परतला नाही त्यामुळे कुटुंबियांनी शोधायला सुरुवात केली शोधून शोधून थकले पण अरहान चा पता लागला नाही अनोळखी व्यक्तीने त्याचे अपहरण केले अशी तक्रार त्याच्या वडिलांनी चिखली पोलिसात दिली यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.