प्रतिनिधी आकाश जळके अंबड
जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ , अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार , निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ , अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांचे महसूल पथक यांनी कारवायांचा धडाका सुरूच ठेवलेला आहे.
गुरुवार , 04 जुलै रोजी अंबड तालुक्यातील हसनापुर येथील गोदावरी नदीपात्रातून महसुल पथकाने दोन वाळूचे ट्रॅक्टर पकडून ताब्यात घेतले .
सविस्तर माहिती अशी की गुरुवारी गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांचे पथक गुप्त मार्गाने हसनापूर येथे गेले . गोदावरी नदीपात्रात दोन वाळूचे ट्रॅक्टर वाळू भरताना दिसले . ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला विचारला गेली असता त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना अथवा पास दिसून आला नाही . त्यामुळे सदरचे ट्रॅक्टर पोलीस वसाहत गोंदी येथे लावण्यात आले.
दोन्ही ट्रॅक्टरमध्ये अंदाजे प्रत्येकीएक एक ब्रास वाळू असल्याचे दिसून आले . त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शेळके यांनी सांगितले .सदर कारवाई करताना मंडळ अधिकारी प्रमोद काटकर , तलाठी विनोद ठाकरे , ज्ञानेश्वर चौरे , अक्षय देशमुख , दीपक लव्हाळे , विवेक गोसावी , सचिन बागुल , किरण जाधव , संजय पालवे , रामकिसन महाले तसेच कोतवाल अशोक शिंदे व अरुण पठाडे सोबत होते . या कारवाईनंतर हसनापूर येथील नागरिकांनी महसूल विभागाचे व पोलीस विभागाचे आभार मानलेले आहेत .
अंबड तालुक्यात मागील वर्षी अवैध उत्खनन करताना पकडण्यात आलेली वाहने 32 असून त्यावर 52 लाख 65 हजार दंड आकारणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 35 लाख 10 हजार दंड वसूल झाला असून चालू वर्षी म्हणजे एक एप्रिल ते आजतागायत एकूण 21 वाहने पकडण्यात आलेली असून त्यावर 46 लाख 65 हजार दंड आकारण्यात आलेला आहे . त्यापैकी आजपावेतो 17 लाख 75 हजार रुपये दंड वसूल झालेला असून बाकी शिल्लक राहिलेली वसुली करण्याची कार्यवाही चालू आहे , असे अव्व्ल कारकून नवनाथ घोरपडे यांनी सांगितले . अवैध गौण खनिज उत्खनन विरोधी पथकाच्या मार्फत एकूण 10 साठे जप्त करण्यात आले असून 731 ब्रास वाळू जप्त करण्यात आलेली आहे . त्यापैकी शंभर ब्रास वाळू तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आलेले होती . सदर वाळू मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या मागणीनुसार आर्थिक दुर्बल घटकांना मोफत प्रत्येकी पाच ब्रास महाखनिज प्रणालीवर अपलोड करून एटीपी द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे , अशी माहिती नायब तहसीलदार धनश्री भालचीम यांनी दिली .
यानंतरही जिल्ह्यात अशाच प्रकारे वाळू चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अथवा धडक कारवाया करण्यात येतील , असे अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी सांगितले .
उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी तालुक्यातील सर्व जनतेस जाहीर आवाहन केले आहे की तालुक्यात कोठेही अवैधरित्या गौणखणिजाची चोरी , वाहतूक होत असेल तर तात्काळ महसूल विभाग अथवा पोलीस विभागास कळवावे.





Social Plugin