बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
माण तालुक्यातील गोंदवले येथील (खुर्द)बौद्ध समाजातील सुरज सुनील शिलवंत या युवकाच्या आत्महेत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी खटाव तालुका नेते गणेश भोसले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात पुढे म्हणाले की , माण तालुक्यातील गोंदवले (खुर्द) दलित (बौद्ध) तरुण सुरज सुनील शिलवंत या खाजगी सावकारीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्याच कारणीभूत असणाऱ्या गावातील राम कट्टे, आशितोष कट्टे, आदर्श कट्टे, शिवतेज कट्टे, संजय शेडगे व इतर या सर्व गावगुंडावर ॲट्राँसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला असून आमची मागणी अशी आहे की माण तालुक्यातील सर्व खेडोपाडी गावातील खाजगी सावकारी करणा-या शोधून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी. तसेच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. संबंधित सुरज शिलवंत याच्या कुटुंबातील लोकांना पोलिस संरक्षण देण्यात यावे. तसेच शासनाने तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.
शासनाने व प्रशासनाने प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी.अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे मागणीचे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते गणेश भोसले, पँथर ग्रुप चे अध्यक्ष भगवान मोरे, जेष्ठ आंबेडकर चळवळीतील नेते आनंद साठे, संदिप काळे, रुपेश कांबळे, आनंदा दुबळे, युवराज रणदिवे, अभिजित बोकडे, गणेश यादव, आनंदा शिंदे, प्रकाश भोसले, युवराज झेंडे, सचिन शिंदे, जगदीश झेंडे , अक्षय खरात इ. भिमसैनिक उपस्थित होते.





Social Plugin