Ticker

6/recent/ticker-posts

तेजतारा फाऊंडेशन महिला सबलीकरण मोहीम


चंद्रशेखर कदम @ ग्रामीण प्रतिनिधी

तेचतर फाउंडेशनच्या येवला यांच्यावतीने विठ्ठल मंदिर हॉलमध्ये दोन दिवस फॅशन डिझाईन कोर्स अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन संपन्न. यात अंदरसुल व परिसरातील सुमारे 200 महिलांचा सहभाग नाशिक येथील शैला कारले यांनी महिलांना अतिशय सोप्या पद्धतीने नऊवार , साडी पेशवाई , मस्तानी आधी साड्या कशा बनवायच्या याचे प्रशिक्षण दिले यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसा करून उपजीविकेचे साधन होणार आहे तेजतारा फाउंडेशनच्या संचालिका सौ. तेजश्री बिपिन लासुरे यांनी या बाबत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमची संस्था गेली अनेक दिवसांपासून महिला सक्षमीकरणाचे काम करीत असून या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते अनेक महिलांच्या कलागुणांना वाव दिली जाते अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात महिला सहभागी होत आहे. यापुढे अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविण्याचा मनोदय यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला मार्गदर्शक मा. किशोर सोनवणे तसेच श्री बिपिन लासुरे, चंद्रशेखर कदम ,सौ अर्चना शिंदे ,सौ डिंपल बालसिंग ,आदींचे सहकार्य लाभले