प्रतिनिधी-संजय भरदुक मंपीर
मंगरूळपिर- आज दिनांक १७ जुलै २०२४ बुधवार ला चौबुजी हनुमान मंदिर व विश्वेश्वर शिवलिंग महादेव मंदिर मंगलधाम मंगरूळनाथ येथील मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने सदानंद महाराज महिला हरिपाठ भजनी मंडळ मंगलधाम या भजनी मंडळांनी भजनाचा कार्यक्रम केला तसेच हे भजनी मंडळ अनेक वर्षांपासून बालाजी मंदिर मंगलधाम मध्ये दरदिवशी हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम करतात
व अनेक कार्यक्रमात सहभाग घेतात व धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात व भजन करतात.या भजनी मंडळात कासाबाई देवराव इंगोले, कुसुम तुकाराम भरदुक,मिना मनोहर बोरकर, नीता नंदकिशोर बोरकर, रूक्मिणी सखाराम ठाकरे,सिंधू निलकंठ ठाकरे, शोभा श्रावण अंबलकर,उषा मनोज राठोड,बबिता मोहन महाकाळ,देवका गायकवाड, कौसल्या मिटकरी,मुंढरे या महिला सदानंद महाराज महिला हरिपाठ व भजनी मंडळ मंगलधाम मंगरूळनाथ च्या सदस्य हजर असतात. या सर्व महिलांनी उत्तम असा भजनाचा कार्यक्रम सादर केला





Social Plugin