आरोग्य शिबिरामध्ये हजारो रुग्णांनी घेतला मोफत उपचार, तालुक्यामधील नामवंत डॉक्टरांची होती उपस्थिती
प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
मलकापुर :- विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मलकापूर प्रखंड द्वारा आयोजित,'सेवा सप्ताह' मोफत वैद्यकीय चिकित्सा सप्ताह 27 जून ते 5 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला होता. आज या कार्यक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने प्
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून ज्याप्रमाणे धर्मरक्षणाचे कार्य होते त्याचप्रमाणे समाजातील तळागाळापर्यंत आरोग्यसेवा नेण्याचे कामही मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते याचाच हा भाग म्हणून सेवा सप्ताह असतो. या सप्ताहाच्या निमित्ताने गरजूंना मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली यात 2 हजारहून अधिक गरजूंची मोफत तपासणी झाली. यात सर्वच विभागातील तपासण्या होऊन गरजूंना योग्य तो सल्ला आणि उपचाराचे मार्ग खुले करण्यात आले .याच बरोबर मोफत औषधीचे वाटपही करण्यात आले .
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा वि.हि.परिषदेचे खामगाव जिल्हा सेवा सहप्रमुख डॉ. मुकेशजी गोठी यांनीसप्ताहातील सेवा कार्याची प्रस्तावनेतून माहिती दिली.यानंतर वि.हि.प चे विदर्भ प्रांत सहमंत्री ऍड.अमोलभाऊ अंधारे यांनी वि.हि.परिषद आणि बजरंग दलाच्या सेवा कार्याविषयी माहिती दिली. यामुळे समाजातील गरजूंना सेवा देऊन त्यांचे त्वरित उपचार होतील.कार्यक्रमात योगदान देणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर वि.हि.प.चे विदर्भ प्रांत सहमंत्री ऍड.अमोल अंधारे रा.स्व.संघाचे तालुका संघचालक ज्ञानदेव पाटील, रा.स्व.संघाचे मलकापूर नगर संघचालक दामोदरजी लखानी, खामगाव जिल्हा वि.हि.प.चे जिल्हा मंत्री राजेंद्र सिंह राजपूत खामगाव जिल्हा वि.हि.प. चे सेवा प्रमुख भावेश चव्हाण मलकापूर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ.मुकेशजी घोटी, केमिस्टचे अध्यक्ष गोपालजी मालपाणी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील,मलकापूर बजरंग दल नगर संयोजक दीपक कोलते,इंफाचे अध्यक्ष डॉ.राणे, ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी, मिलिंद डवले,विशाल झंवर आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या सेवा सप्ताहात डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल,जळगाव येथील डॉ. स्वप्निल अंधारे,डॉ.शिवांगी काकडे, डॉ. प्रतीक्षा जिंतूरकर, डॉ.नेहा कदम,डॉ.पारितोष, डॉ. ललित कुमार, डॉ.रश्मी सांगवी, यांनी योगदान दिले.
कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.






Social Plugin