कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी
दि. 05 जुलै 2024 रोजी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने मंठा सेंटरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती मंठा येथे करण्यात आले होते. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांनची उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञ संचालन कैलास कोल्हे यांनी केले. या कार्यक्रमाचा निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जालना विभागाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री जोमा मस्ती हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंठा येथील पोलिस स्टेशनचे एपीआय श्री. कैलास भारती हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानराधा इंग्लिश स्कूलचे संस्थापक श्री अंकुश नाना मोरे, मंठा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्सस्टेबल श्री.विलास कातकडे, पोलिस काॅन्सस्टेबल श्री प्रशांत काळे तसेच सामाजिक कार्यकर्ते भागवत गोंडगे व पञकार राजु पवार हे उपस्थित होते.
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत आहे. मुलांचा सर्वागिण विकास व्हावा या साठी 2008 पासुन जालना जिल्ह्यात मंठा, वाटुर, जालना, बदनापुर व भाटेपुरी या ठिकाणी काम करते आहे. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साठी ही मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मदत ही पुरवली जाते. या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती. डाॅ. विल्यी डाॅक्टर या आहेत.
विद्यार्थ्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचा शैक्षणिक विकास हा साध्य केल्या जातो. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मध्ये मंठा सेंटरच्या 70 विद्यार्थ्यांना बॅग, रजिस्टर, कंपास, चिञकला वही व आलेख पुस्तक इत्यादी साहित्य हे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचा निमित्ताने आलेल्या अतिथीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या संस्थेच्या माध्यमातून आपण मिळालेल्या मदतीच्या माध्यमातून आपण स्वताःचा पाया वर उभे राहीले पाहीजे व शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेले पाहीजे असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे कैलास कोल्हे, समाधान गडदे,अमोल ठोकरे, अमोल गोंडगे, प्रभाकर कराळे तसेच मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थी उपस्थित होते.





Social Plugin