Ticker

6/recent/ticker-posts

अंबड तालुक्यातील खेळाडूंना न्याय देण्यासाठी सत्याग्रह


 प्रतिनिधी आकाश  जळके

        अत्याधुनिक क्रीडा साहित्य आणि सर्व सुविधांसह विविध प्रकारच्या खेळांसाठी क्रीडांगण उपलब्ध करून देणे करिता तालुका क्रीडा संकुल चे अध्यक्ष आमदार नारायण कुचे, उपाध्यक्ष तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि सचिव जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. नालायक क्रीडा अधिकारी, बेजबाबदार प्रशासन आणि निर्लज्ज अध्यक्षांनी जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली. 

       अंबड तालुक्यातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा साहित्य सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी आणि कर्तव्य असतानाही गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा भेट घेऊन चर्चाही करण्यात आली .परंतु कोट्यावधी रुपये असूनही संकुलातील विविध प्रकारच्या खेळांसाठी क्रीडांगण विकास आराखडा क्रीडांगणाची ब्लू प्रिंट तयार नाही.नियोजन शून्य कारभार चालत असल्याने प्रशासकीय मान्यता नाही असे चित्र दिसून येत आहे.एकदाही वापरातन  न आलेल्या अत्यंत दुरावस्थेत पडलेल्या तालुका क्रीडा संकुल अंबड चे क्रीडांगण माननीय तहसीलदार आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अरविंद विद्याघर यांच्या सहकार्याने खेळाडूंना वापरा योग्य करण्यासाठी क्रीडा प्रेमीकडून  यशस्वी प्रयत्न करण्यात आले .तालुका क्रीडा संकुल अंबड दुरुस्ती करिता लागलेल्या पैशांसाठी सत्याग्रह करावा लागेल.

     अनेक वेळा भेट देऊन चर्चा करण्यात आली परंतु कार्याला गती मिळाली नाही .फक्त उत्तर मिळते आता खूप कामे आहेत. क्रीडा अधिकार्‍याचे कर्तव्य आणि जबाबदारी असूनही विकास कार्याला गती मिळत नाही. या उलट एका क्रीडा प्रेमी नागरिकांनी स्वखर्चातून हॉलची  डाकडूजी करून बॅडमिंटनचे क्रीडांगण दहा दिवसात तयार केले अधिकाऱ्यांना मात्र पूरसद मिळत नाही.

       येत्या आठ दिवसात विकास आराखडा ब्लू प्रिंट प्रशासकीय मान्यते सह टेंडर काढून आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार न पडल्यास अंबड तालुक्यातील क्रीडा प्रेमी खेळाडूंच्या वतीने खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाला बसून सत्याग्रह करणार आहे