श्री हनुमानगिरी हायस्कूल येथे पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
विदयार्थी हिताकरता संस्था नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देत असून स्पर्धेत टिकणारा विद्यार्थी इथे घडत आहे .पालक, शिक्षक , संस्था पदाधिकारी यांच्या वैचारिक समन्वयातून शाळेने स्कॉलरशिप, एन .एम.एम.एस. सारथी, नवोदय , सैनिक स्कूल निवड परिक्षा , इयत्ता १० वी, १२ वी बोर्ड आणि क्रिडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे अभिमानास्पद आहे . पालकांची पाल्याबाबत जागरुकता व शिक्षकांचे अध्यापन कौशल्य यातून यशस्वी विद्यार्थी घडतो .
असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले . ते श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथील पालक शिक्षक सहविचार सभेत बोलत होते . पर्यवेक्षक आर .एन. जाधव यांनी प्रास्ताविक केले . मोहनराव गुरव, अनिल पाकले , सौ अमृता जाधव , यांनी शिक्षक मनोगते व्यक्त केली . विजय पंडीत सर, प्राचार्य श्री डी .एन. गोफणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . प्रकाश ठोंबरे, प्रल्हाद कुचेकर, सुरेखा कुंभार यांनी पालक मनोगते व्यक्त केली .
यावेळी पालक शिक्षक संघ, माता पालक संघाची स्थापना करून नवीन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या . कार्यक्रमास संस्था उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, अविनाश जाधव, सौ भूपाली जाधव, सौ मंजुश्री लावंड, श्री नवनाथ फडतरे, पुसेगाव व पुसेगाव पंचक्रोशीतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . वाय . ए . घुगरे यांनी सूत्रसंचालन तर बी .एस. जाधव यांनी आभार मानले .
Social Plugin