बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
आईचे बाळाबरोबर जगणे सुरू असताना तिचे आयुष्य वेगळे बनलेले असते . बाळ गर्भावस्थेत असताना अनेक वेळा आईला आपले प्राण गमवावे लागतात अशा घटनांना नियंत्रित करण्यासाठी मातृसुरक्षासाठी पालकत्वाची भूमिका महत्त्वाची असते असे प्रतिपादन डॉ. अर्चना धोंगडे- पोरे यांनी व्यक्त केले. कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव येथील भूगोल विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, व अग्रणी कॉलेज लीड अंतर्गत जागतिक मातृसुरक्षा दिन आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमासाठी उपस्थित महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी. भोसले, डॉ.संजय क्षीरसागर, डॉ.एस.आर.शिंदे प्रा.श्रीमती एम.बी. सोनार, डॉ.ए. एस. जगताप इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे डॉ.अर्चना धोंगडे -पोरे म्हणाल्या, मातांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मातांनी मातृत्व दरम्यानच्या काळात आरोग्याची चांगली काळजी घेतली पाहिजे बाळाला जन्म देताना खूपच रक्तस्त्राव होतो.
त्यामुळे रक्तदाब नियंत्रित न राहिल्यामुळे मातांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. म्हणून गर्भवती असताना नियमितपणे आरोग्याची तपासणी केल्यामुळे गर्भावस्था दरम्यान होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. दोन अपत्यांमधील सुरक्षित अंतर राहिलं नाही तर मातेचे व बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते या विषयीची माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी. भोसले म्हणाले ,'मातृत्व हे सर्वात मोठे सुख मानले जाते. माता व जन्माला येणाऱ्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी मातृ सुरक्षा दिन साजरा केला जातो .मातृत्व दरम्यान मातांना महत्त्वपूर्ण उपचार केल्यामुळे माता आणि बाळ सुरक्षित राहण्यास मदत होते. याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.आर.धोंगडे यांनी केले. तर आभार प्रा.एच.जी .निमसे यांनी मानले
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin