Ticker

6/recent/ticker-posts

पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचना



बंडु शिंगटे  घुंगर्डे हादगाव 

अंबड : तालुक्यात  पिक कर्जासाठी बँका  शेतकऱ्यांची अडवणूक होत करत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.  भाजपा नेते सतीश घाटगे यांच्याकडे काही शेतकऱ्यानी तक्रारी केल्या होत्या. या शेतकऱ्यांच्या पिक कर्जासाठी सतीश घाटगे यांनी थेट बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकांना जाब विचारला. शेतकरी बांधवांना तात्काळ पिक कर्ज देण्याच्या सूचना सतीश घाटगे यांनी सोमवारी केल्या. 

 सतीश घाटगे यांनी सोमवारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन घनसावंगी येथील बॅक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत भेट दिली. शाखा व्यवस्थापक खुशाल शेंगणे यांच्याशी शेतकऱ्यांच्या पिक कर्ज प्रस्तावाबाबत माहिती घेतली. एकरुखा येथील शेतकरी बांधवांना तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. तसेच पिक कर्जासाठी एकाही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्याचीही विनंती त्यांनी केली.   यावेळी विष्णुपंत जाधव, प्रभाकर धांडे, बाबासाहेब हरबक, अर्षद पटेल, राजेंद्र छल्लारे, पंकज रक्ताटे,  भरत सपाटे, भास्कर खाडे, कन्हैयालाल कायस्थ, भागवत खाडे, बद्रीनाथ खाडे, दत्ता खेडकर, शंकरराव जाधव, उद्धव खाडे, धनुलाल कायस्थ, सुभाष कायस्थ, कैलास मदनुरे, शिवाजी मदनुरे, डिगांबर जोशी, बाळू खाडे, उद्धव खाडे, सुनील खाडे, रामदास पोटे, दत्ता नखाते, वसंत पवार, प्रल्हाद खेडकर,प्रकाश खाडे,संतोष खाडे,दिलीप खाडे,महादेव मदनुरे,राहुल पोटे, दीपक पोटे ,नंदू खाडे, मधुकर जाधव, अंशीराम ठुले,अं कुश खाडे व शेतकरी उपस्थित होते.