प्रतिनिधी पी के गावीत,
भवाडा परिसरात भात लागवडीला जोरदार सुरुवात झाली आहे. वरच्या पावसावर आधारित असलेले त्या ठिकाणचे शेतकरी कामाला चांगलेच लागले आहे. वर्षातून एकदाच भात लागवड असल्यामुळे चांगलेच जोराने सुरुवात केली आहे.
त्यामध्ये भात लागवड असेल, नाचणी असेल, उडीद, तूर आणि वरई इत्यादी पिकांचा समावेश होतो. सर्वात जास्त भात आणि नाचणी व उडीद हे घेतले जाते.
त्या परिसरातील आदिवासी क्षेत्र असल्यामुळे जास्त प्रमाणावर रानभाज्यांचा समावेश होतो. तिन्ही ऋतूमध्ये रानमेवा त्यांच्या आहारामध्ये आढळतो.





Social Plugin