प्रतिनिधी/प्रशांत सोनवणे
फलटण:रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी वर्षावास प्रवचन मालिका मुंजवडी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या विद्यमाने प्रवचन मालिका २०२४ प्रथम पुष्प गुंफण्यात आले. प्रथमतः महाकरूणी तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून समुहीक त्रिसरण, पंचशील बुद्ध पूजा घेण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका अध्यक्ष महावीर सर्जेराव भालेराव सर हे अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व विभागाचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते सर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने कार्यक्रमाचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रवचन मालिकेचे प्रवचनकार म्हणून लाभलेल बाबासाहेब जगताप सर यांनी वर्षवास म्हणजे काय?, आषाढ पौर्णिमा म्हणजे काय?, आणि गुरुपौर्णिमा म्हणजे काय?, हा विषय अतिशय सुंदर व आकर्षक शब्दांमध्ये व्यक्त केला व या दिवसाचे महत्व समजावून सांगितले.यानंतर नानासाहेब मोहिते सर यांनी प्रवचन मालिकेसाठी उपस्थित त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले अध्यक्षीय भाषण व्यक्त करताना आपल्या भाषणामध्ये उपस्थित त्यांना भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची माहिती दिली तसेच पर्यटन बौद्ध स्थळे याविषयी सर्वांना माहिती दिली आणि भारतीय बौद्ध महासभेचा सभासद हा प्रत्येक कुटुंबामध्ये असला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. तसेच भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका संस्कार सचिव बजरंग गायकवाड यांनी इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी झटपट ज्ञान परीक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने २५ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे माहिती देऊन आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फलटण तालुका महासचिव बाबासाहेब जगताप सर यांनी केले. बजरंग गायकवाड सर यांनी आभार व्यक्त केले .भीमरत्न तरुण मंडळ मुंजवडी फलटण यांनी उत्कृष्टरित्या कार्यक्रम आयोजित करून यशस्वी पार पडला.
यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका संस्कार सचिव बजरंग गायकवाड सर फलटण तालुका कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर सचिव चंद्रकांत मोहिते सर, हे हिशोब तपासणीस सतीश कांबळे सर, संरक्षण सचिव अमोल भोसले सर, विलास जगताप सर, संघटक श्रीनिवास धांईजे सर, संघटक अमोल काकडे सर, संघटक आनंदा जगताप सर, संघटक प्रशांत सोनवणे मुंजवडी येथील बौद्ध उपासक आणि उपासिका भिमरत्न तरुण मंडळांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin