Ticker

6/recent/ticker-posts

वर्धनगड येथे तिघांची घरावर दगडफेक, पोलीस पाटलांनाही मारहाण

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

वर्धनगड येथे राजेंद्र वरेकर यांचे बंद घरावर रामोशीवाडी येथील सचिन दिनकर बुधावले, रमेश विश्वास बुधावले, व जयवंत प्रमराव बुधावले उर्फ लाल्या या तिघांनी मोठ मोठाले दगड फेकून घरावर हल्ला करून घराची मोडतोड केली. तसेच येथील पोलीस पाटील गणेश जठार व पवारवाडीचे पोलीस पाटील विकास जाधव यांनी घरावर दगडफेक करू नये यासाठी अडवणूक केल्याने त्यानाही दगडाने मारहाण केली असल्याची फिर्याद पोलीस पाटील गणेश जठार यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनला दिली आहे.

पुसेगाव मिळालेली पोलिसांकडून माहिती अशी, रामोशीवाडी येथील सचिन बुधावले, रमेश बुधावले, व जयवंत (लाल्या) बुधावले यांनी वर्धनगड येथे सायंकाळी सहाच्या दरम्यान पल्सर गाडीवरून येऊन रमेश कुंभार यांच्या दुकानासमोरील राजेंद्र वरेकर यांच्या राहत्या घरावर तुफान दगडफेक करीत राजेंद्र वरेकर यांचे लोखंडी गेट, तसेच घरांचे दरवाजे बोरवेल व घरा बाहेरील साहित्य मोठ मोठाले दगड फेकून मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. या दरम्यान येथील पोलीस पाटील गणेश जठार व पवारवाडीचे पोलीस पाटील विकास जाधव यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, या तिघांनी मिळून या दोघांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण करून

जखमी केले. व तुम्हाला दोघांना सोडणार नाही बघून घेतो, अशी धमकी दिली, व लाथा बुयांनीही मारहाण केली .शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलीस पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पुसेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने फौजदार शिंदे हे करत आहेत.