बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी समता फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालय येथील नेत्र चिकित्सक यांच्यातर्फे डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ज्या-ज्या बंद्यांना चष्मा लागला आहे, त्या सर्व बंदयांना समता फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे “मोफत चष्मा वाटप” करण्यात येणार होते. त्यानुसार आज रोजी जिल्हा न्यायालय, सातारा येथील न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती नीना बेदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते कारागृहातील एकूण 37 बंदयांना चष्मे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती नीना बेदरकर, समता फाउंडेशन चे प्रतिनिधी सत्यनारायण इंगळे, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, सीनियर जेलर ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार अहमद संदे, हवालदार वाघेश्वर गरुड, हवालदार सुदाम बर्डे, शिपाई यशवंत पाटील, सागर मासाळ, संजय यादव, प्रेमनाथ वाडेकर, बालाजी मुंडे, काजल साईमोते, ज्योती शिंगरे इत्यादी व इतर बंदी हजर होते.





Social Plugin