Ticker

6/recent/ticker-posts

डीजी कॉलेजमध्ये फ्युचर बँकर्स क्लबचे उद्घाटन


बुध  दि .[ प्रकाश राजेघाटगे ] 

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने फ्युचर बँकर्स क्लब स्थापन करण्यात आलेला असून 19 जुलै बँक राष्ट्रीयकरण दिनाचे औचित्य साधून या क्लबचे उद्घाटन भारतीय रिझर्व बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मा. श्री अविनाश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील युवक युतींना बँकिंग क्षेत्रातील करियरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी तसेच देशातील बँकिंग इंडस्ट्री करिता आवश्यक असणारे सक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी महाविद्यालयाच्या बँक मॅनेजमेंट विभागाने हा क्लब स्थापन करण्यात केलेला असून या अंतर्गत बँकिंग क्षेत्रातील नवनवीन रोजगार विषयक संधी, बँकिंग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात होत असणारा वापर, वित्तीय साक्षरता, सायबर सिक्युरिटी, बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील नवनवीन प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दलची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. बँक मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातून या विद्यार्थ्यांना मिळणारे बँकिंगचे ज्ञान व बँकिंग सर्विसेस वापरण्याचे स्किल्स परिसरातील सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी या क्लबच्या माध्यमातून विस्तार सेवा सुरू केल्या जाणार असून त्या अंतर्गत परिसरातील ग्रामीण नागरिकांना बँकेच्या विविध योजना, बँकेतील उपलब्ध कर्जाचे विविध प्रकार, शेतकरी छोटे उद्योजक व्यावसायिक यांना उपयुक्त ठरणाऱ्या बँकिंग सेवा, इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवांचा सुरक्षित वापर, इलेक्ट्रॉनिक बँकिंग मधील सायबर विषयक धोके इत्यादी बाबतचे प्रबोधन करण्याचे कार्य देखील हाती घेतले जाणार आहे. महाविद्यालयातील बँकिंगचे विद्यार्थी व परिसरातील सामान्य जनता यांच्यामध्ये वित्तीय साक्षरतेची नाळ जोडण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे असे मत अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. महाविद्यालयीन स्तरावर ती अशा प्रकारच्या क्लबच्या माध्यमातून हाती घेतल्या जाणाऱे उपक्रम निश्चितच उल्लेखनीय असून धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे असे उपक्रम हाती घेणारे एकमेव महाविद्यालय असल्याचे त्यांनी सांगितले. 

बँकिंग हे तरुण तरुणांना उत्तम रोजगार विषयक संधी देणारे क्षेत्र असून देशातील बँकिंग क्षेत्रांना तज्ञ व कुशल बँकर्सची आवश्यकता आहे. महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून आज अखेर 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बँकेतील विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत ही एक उल्लेखनीय बाब आहे. भविष्यात फ्युचर बँकर्स क्लबच्या माध्यमातून या देशातील बँकिंग क्षेत्रास तज्ञ, कुशल व सामाजिकतेचा चेहरा असणारे बँकर्स उपलब्ध होतील असा विश्वास श्री जोशी यांनी व्यक्त केला. 


महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. विठ्ठल सावंत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचा बँक मॅनेजमेंट विभाग हा एक अग्रगण्य विभाग असून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले जात असतात. केवळ अभ्यासामध्येच नव्हे तर क्रीडा, संगीत, संशोधन, विस्तार सेवा अशा विविध क्षेत्रात बँक मॅनेजमेंटचे विद्यार्थी उल्लेखनीय यश प्राप्त करत असतात. फ्युचर बँकर्स क्लब हा या विभागाअंतर्गत सुरू करण्यात येणारी महत्त्वपूर्ण प्रकल्प असून त्याचा निश्चितपणे विद्यार्थ्यास व महाविद्यालयास फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. 

बँक मॅनेजमेंट विभाग हा महाविद्यालयाचा चेहरा असून परिसरातील तरुण-तरुणींना बँकिंग क्षेत्रातील उत्तमात उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत, विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअर साठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन कौशल्याभिमुख शिक्षण देण्याची व्यवस्था महाविद्यालयाचा बँक मॅनेजमेंट विभाग करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग वित्तीय विमा व गुंतवणूक क्षेत्रात आपले करिअर करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बँक मॅनेजमेंट विभाग करत असून आम्ही विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सतत तत्पर असल्याचे मत विभाग प्रमुख डॉ. विजय कुंभार यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉक्टर विठ्ठल सावंत, बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ विजय कुंभार, समन्वयक डॉ. राजशेखर निल्लोलु, फायनान्शिअल मार्केटचे समन्वयक डॉ. विजय पाटील, स्टॉक मार्केट लॅबच्या समन्वयक भाग्यश्री वागडोळे, सर सीडी देशमुख मॉक बँकेच्या समन्वयक रोहिणी भोसले, इतर शिक्षक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.