Ticker

6/recent/ticker-posts

शेगाव, पंढरपूर महामार्गावर आष्टी कॅम्प येथे रोड जंक्शन द्या : सुग्रीव मुंढे


प्रतिनिधी आकाश जळके

     शेगाव, पंढरपूर महामार्गावर परतूर तालुक्यातील आष्टी कॅम्प येथे भगवान बाबा नगर, दत्त नगर, पळशी व आनंदगाव या गावांना जाण्यासाठी व दळणवळणासाठी एकमेव रस्ता आहे. हे शेगाव, पंढरपूर महामार्ग करणाऱ्या अभियंत्यांना माहिती नाही का ? की , या महामार्गास या चारही गावांना जाण्यासाठी- दळणवळणासाठी जंक्शन ची गरज आहे. मात्र आपल्या संबंधित यंत्रणेने जाणीव पूर्वक येथे जंक्शन दिल्या गेलेला नाही . हा रस्ता शेगाव, पंढरपूर रस्त्यास जोडला गेलेला नाही त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी करणारी वाहने , मोटर सायकली आणि गावकरी हे पंढरपूर रस्त्यावर येण्यासाठी विरुद्ध दिशेने जवळपास अर्धा की.मी. गेल्यानंतर जंक्शन मिळतो. यामुळे हा प्रकार एखाद्याचा जीव घेऊ शकतो किवा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या महामार्गावर आष्टी कॅम्प येथे जंक्शन न दिल्यामुळे मोठ्या जड वाहनांना वळण रस्ता या साठी दुभाजक तोडून व्यवस्थित जंक्शन करण्याची गरज आहे. तरी आपण या प्रकरणात लक्ष घालून ज्या अभियंत्यांनी येथे जंक्शन केले नाही यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून तातडीने दिनांक १५ जुलै २०२४ पर्यंत येथे जंक्शन करावा हि विनंती . न केल्यास लोकशाही मार्गाने रस्ता रोको, उपोषण सह विविध मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा  सुग्रीव सोपानराव मुंढे संजोग साहेबराव हिवाळे, जगदीश राठोड यांनी जिल्हा अधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनातं म्हटले आहे.