Ticker

6/recent/ticker-posts

ना. महेश शिंदे युवा मंच तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

विसापूर येथील ना.महेश शिंदे युवा मंच तर्फे राज फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त विसापूर जि. प. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून युवा मंच तर्फे विधायक उपक्रम राबविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

 युवा मंचच्या वतीने शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी जेष्ठ नागरिक दशरथ सावंत, युवा मंच सदस्य प्रथमेश सावंत, राज फडतरे, विजय सावंत, अनिकेत सावंत, निखिल शिंदे, गणेश शिंदे, प्रथमेश फडतरे तसेच शिक्षिका स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर धायगुडे यांनी स्वागत केले. प्रथमेश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले तर वैशाली नांदे यांनी आभार मानले.