प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजुला असलेल्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे येत्या रविवारी लोकार्पण होणार आहे. बा. पार्श्वभूमीवर वा इमारतीच्या मार्गावरील सुमारे २० ते २५ दुकाने, टपऱ्या आज बुधवारी नगरपालीके च्या पथकाने हटविल्या. त्यामुळे प्रशासकीय इमारतीकडे जाणारा मार्ग प्रशस्त झाल्याचे सांगण्यात येते.
चाळीसगाव येथे रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजुला ग्रामीण रुग्णालमाला लागून असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत लवकरच कामकाजाच्या दृष्टीने सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रशासकीय इमारतीच्या मार्गावर असलेले व परिसरातील अतिक्रमण आज बुधवारी पालीकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने व आरोग्य विभागाच्या पथकाने हटवले. या पथकात दिनेश जाधव, संजय राजपूत, संजय गोयर, दीपक देशमुख, किरण मोरे, सुमित सोनवणे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी कार्यवाही केली. प्रशासकीय इमारतीबाहेर पासून ते वाव पॉईन्ट धुळे रोड, मालेगाव रोड भागातील सुमारे २० ते २५ दुकाने हटविण्यात आले.





Social Plugin