Ticker

6/recent/ticker-posts

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू



बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

उमरखेड येथील उत्तरवार शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व सहकार्याच्या हलगर्जीपणामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने सिजर केल्यामुळे पत्नी प्रतीक्षा कुकडे हीचा मृत्यू झाल्याचा आरोप पती अमोल उत्तम कुकडे यांनी केला. पतीने पत्नीचा मृत देह पोलीस ठाण्यात नेत रविवार दिनांक 7 जुलै ला तक्रार नोंदविली. प्रतीक्षा बाळंतपणासाठी उमरखेड तालुक्यातील कुपटी येथे माहेरी आली होती. 5 जुलै रोजी सकाळी पोट दुखत असल्याने तिला उत्तरवार रुग्णालयात भरती केले. डॉक्टर व परिचारिकांनी 6 जुलै ला सकाळी 8 वाजता शस्त्रक्रिया केली. यानंतर अचानक प्रतीक्षा हीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी पून्हा शस्त्रक्रिया गृहात नेले.

 प्रथम शस्त्रक्रिया करताना चुकीच्या पद्धतीने टाके मारल्यामुळे प्रतिक्षाला रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यामुळे पुन्हा शस्त्रक्रिया करून प्रतीक्षाला ओव्हर डोस म्हणजे जास्तीची औषधे दिली गेली. त्यामुळे रक्तदाब व हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले. यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरनी तिला नांदेड येथे रेफर केले. परंतु तोपर्यंत रुग्णाची प्रकृती अतिशय खालावत गेली. अखेर नांदेड येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या बेजबाबदरपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करून उमरखेड उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वर कारवाई करण्याची मागणी अमोल कुकडे यांनी केली. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते मृत देह घेऊन गेले.