प्रतिनिधी :- सचिन ठुले
झाडांना आपल्या ग्रहाचे फुफ्फुस म्हणून संबोधले जाते आणि ते एका चांगल्या कारणासाठी ते आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यास महत्वाची भुमिका बजावत असताना आणि पृथ्वीवरील जीवनाचा आवश्यक घटक आहेत वृक्ष लागवडीचे कार्य केवळ आपल्या पर्यावरणासाठीच नाहीतर संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे आहे.
हि संकल्पना रुजवण्यासाठी सोमवारी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर प्रशालेत विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत गावातून वृक्षदिंडी काढली.वृक्षांची होत असलेली कत्तल पर्यावरणाचा समतोल या विषयाची भुमिका विद्यार्थीनी व वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला व विविध वृक्षांची रोपे आणि पर्यावरण संबंधित पुस्तकासोबत विठू माऊलीचा गजर करत जनजागृती केली.ह्या वेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक. प्रशालेचे मुख्याध्याप प्रेमेंद्र भावसार .सचिन ठोंबरे सर हरीप्रसाद गायकवाड.कैलास जाधव राजकुमार पालमकर हेमंत लहाने महेश जाधव प्रवीण साबणे मधुकर बच्चेवार सर सरिता हंचाटे रुपाली ठाकुर वनिता गुरव रंजना सुत्रावे गोदावरी पोटे श्रीराम काकडे विशाल लक्कमवार मुंजाजी काळे दत्तराव काळे यांनी परिश्रम घेतले .





Social Plugin