कोयनेत दमदार पाऊस . कोयना धरणात २७.९३ टीएमसी पाणीसाठा.चोवीस तासात १.९६ टीएमसी पाणीसाठा, पाणी उंचीत ३.११ फुटाने वाढ.
पाटण (दिनकर वाईकर )
कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत आहे. धरणात सध्या २७.९३ टीएमसी उपलब्ध तर २२.८१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी २२,६७९ क्युसेक्स पाण्याची आवक होत असून पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होत आहे. मागील चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात १.९६ टीएमसी ने तर पाणी उंचीत ३.११ फुटांनी वाढ झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता २७.९३ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरणात २५ टक्केपेक्षा अधिकचा पाणीसाठा झाला आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही ७७.३२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
सध्या समुद्रसपाटीपासून धरणाची पाणी उंची २०७२.६ फूट असून जलपातळी ६३१.६९८ मीटर इतकी आहे. शुक्रवार संध्याकाळी पाच ते शनिवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात व आजपर्यंतचा एकूण पाऊस कोयना मिलिमीटर १३४( १४२९ ), नवजा १३२ मिलिमीटर ( १५२५ ) तर महाबळेश्वर मिलिमीटर ८८ ( १२१६ ) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण २६.५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.





Social Plugin