तालुका :- प्रतिनिधी माहुर ( निलेश जाधव )
मराठवाडा, विदर्भातील ९५ गावांची आणि निम्न पैनगंगा प्रकल्प उर्फ चिमटा धरण कायमस्वरूपी रद्द करावे. त्याऐवजी उच्च पातळी बंधाऱ्याची निर्मिती करून मराठवाडा विदर्भातील सिंचन व्यवस्था सुजलाम सुफलाम करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाड्यातील माहूर किनवट तालुक्यासह विदर्भातील घाटंजी आणि केळापूर महागाव आर्णी तालुक्यातील ९५ गावातील हजारो हेक्टर सुपीक जमीन गिळंकृत करून निम्न पैनगंगा प्रकल्प उर्फ चिमटा धरणाची निर्मिती होत आहे.या प्रकल्पात थांबविल्या जाणाऱ्या पाणीसाठ्याचा उपयोग इतर राज्य घेणार असल्याने तसेच आदिवासीबहुल गावांचा धरन प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या गावांचा कुठलाच प्रशन न सोडवता काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांत दिवसेदिवस आक्रोश वाढत आहे आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी सरकारबद्दल नाराजी वाढत आहे. शेतकरी भूमिहीन होणार आहे त्यामुळे चिमटा धरन कायम बंद करा या मागणीचे निवेदन नामदेवराव केशवे यांनी दिले आहे.





Social Plugin